आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहायक आयुक्तांचा लेट लतिफ कर्मचाऱ्यांना दणका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेत नुकतेच रुजू झालेले सहायक आयुक्त विक्रम दराडे यांनी लेट लतिफ कर्मचाऱ्यांना शनिवारी दणका दिला. दराडे यांनी सकाळी ११ च्या सुमारास महापालिका कार्यालयातील हजेरीपत्रक तपासले, त्यात वेगवेगळ्या विभागातील २३ कर्मचारी कार्यालयात वेळेत हजर नसल्याचे स्पष्ट झाले. या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. त्यामुळे लेट लतिफ कर्मचाऱ्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले आहेत.
महापालिका कार्यालय सकाळी साडेदहा वाजता सुरू होते. परंतु मनपा कर्मचारी काही अधिकारी दुपारी बारा वाजेपर्यंत कार्यालयात फिरकत नाहीत. काही कर्मचारी केवळ हजेरी पत्रकावर सही करण्यापुरतेच कार्यालयात येतात. सही झाली की, हे कर्मचारी कोठे असतात, याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांविराेधात सुरुवातीपासून खमकी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेकवेळा वेगवेगळ्या विभागांना अचानक भेट देऊन तेथील गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. आता चारठाणकर यांच्या सोबतीला कामचुकार कर्मचाऱ्यांविरोधात खमकी भूमिका घेणारा आणखी एक अधिकारी आला आहे. त्यामुळे या कामचुकारांना कायमचा चाप बसण्यास मदत होणार आहे. दराडे यांनी दोन दिवसांपूर्वीच पदभार घेतला. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांनी अचानक कर्मचाऱ्यांचे हजेरीपत्रक तपासले. त्यात वेगवेगळ्या विभागातील तब्बल २३ कर्मचारी कार्यालयात वेळेत हजर नसल्याचे निदर्शनास आले. या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. दराडे यांच्या या अनपेक्षित कारवाईने कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

या विभागातील होते कर्मचारी
सामान्य प्रशासन :
लेखा विभाग : ०१
प्रसिध्दी विभाग : ०३
अतिक्रमण विभाग : ०२
प्रकल्प विभाग : ०२
बांधकाम विभाग : ०१
पाणीपुरवठा विभाग : ०३
नगर सचिव विभाग : ०५
उपायुक्त कार्यालय : ०१
बातम्या आणखी आहेत...