आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपातील गटनेतेपदाचा तिढा वाढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेतील गटनेतेपदाचा वाद मिटण्याऐवजी तो अधिकच वाढला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नगरसेवकांनी गटनेता म्हणून संपत बारस्कर यांच्या नावाचा केलेला ठराव रद्द करण्यात यावा, या मागणीची याचिका नगरसेवक समद खान यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.
राष्ट्रवादीचे अधिकृत गटनेते आपणच असल्याचा दावा खान यांनी केला आहे. यासंदर्भात २६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीनेअपक्ष नगरसेवकांसह शहर विकास आघाडी या नावाने नाशिक विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली होती. त्यावेळी गटनेता म्हणून समद खान यांच्या नावाची नोंद करण्यात आली.
आतापर्यंत खान हेच राष्ट्रवादीचे गटनेते होते. परंतु महापौर निवडणुकीदरम्यान गटनेतेपदाचा मोठा गोंधळ झाला. राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी ठराव करून संपत बारस्कर यांची गटनेते म्हणून निवड केली. त्यानंतर स्थायी समिती सदस्य निवडीच्या वेळीदेखील मोठा वाद झाला. महासभेचे पीठासीन अधिकारी तथा महापौर सुरेखा कदम यांनी राष्ट्रवादीचे गटनेते समद खान यांच्या पत्रानुसारच स्थायी सदस्यांची निवड केली. त्यावर आक्षेप घेत आमदार जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी खंडपीठात याचिका दाखल केली. दरम्यान, महापालिकेचे तत्कालिन नगरसचिव मिलिंद वैद्य यांनी राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून संपत बारस्कर यांना पत्र दिले. तेव्हापासून राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून बारस्कर हेच सर्व पत्रव्यवहार करत आहेत. या गटनेता बदलास खान यांनी आक्षेप घेतला आहे. बारस्कर यांचे गटनेतेपद रद्द करा, या मागणीसाठी खान यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

यासंदर्भात २६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिकेवर ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...