नगर - शहरातकाविळीची साथ सुरू होऊन महिना उलटला. सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांना काविळीची लागण झाली आहे. दोघांचा मृत्यूही झाला. अशी गंभीर परिस्थिती असतानाही महापालिकेला अद्याप जाग आलेली नाही. संपूर्ण आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यात सुधारणा करण्याऐवजी आरोग्य सेवेच्या नावावर नागरिकांकडून दरवर्षी कोट्यवधींचा कर वसूल केला जातो.
मनपाच्या देशपांडे रुग्णालयाचा गोरगरीब महिला रुग्णांसाठी मोठा आधार आहे. तथापि, या रुग्णालयात सोयी-सुविधा कर्मचाऱ्यांची मोठी वानवा आहे. या रुग्णालयात महिन्याला किमान ४५० महिलांची प्रसुती ५० ते ६० सिझेरिन शस्त्रक्रिया होतात. परंतु उपचार करण्यासाठी केवळ दोनच स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. तरी देखील मनपा प्रशासन पदाधिकारी वर्षानुवर्षे केवळ बघ्याच भूमिका घेत आहेत. हे रुग्णालय अत्याधुनिक व्हावे, येथे सर्व प्रकारच्या रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आतापर्यंत कोणतेच प्रयत्न झालेले नाहीत. काविळीच्या साथीने शहरभर थैमान घातले आहे. काही गरोदर महिलांनाही काविळीची लागण झाली आहे. या महिलांवर उपचार करण्यासाठी देशपांडे रुग्णालयात सध्या कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या महिलांना खासगी रुग्णालयांमध्ये महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. शहराच्या विविध भागात असलेल्या आरोग्य केंद्रांची अशीच अवस्था आहे. सातपैकी पाच आरोग्य केंद्रे पुरेसे कर्मचारी इमारतींविना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कर्मचारी रुग्णांना बसायला जागा नाही, उपचारांसाठी लागणारी साधनसामग्री औषधेही उपलब्ध नाहीत.
केडगाव आरोग्य केंद्र, गंजबाजारातील दाणेडबरा आरोग्य केंद्र, माळीवाड्यातील महात्मा फुले आरोग्य केंद्र, झेंडीगेट, मुकुंदनगर नागापूर येथील आरोग्य केंद्रातील सेवा जवळपास ठप्प झाली आहे. आगरकर मळा परिसरात प्रत्येक कुटुंबातील तीन-चार सदस्य काविळीने त्रस्त आहेत. मात्र, अशा परिस्थितीत मनपाची आरोग्य सेवा ठप्प असल्याने उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.
काविळीचीरुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. जे जुने रुग्ण होते, ते बरे झाले आहेत. नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मी बुधवारी अधिकाऱ्यांसह आनंदनगर इतर भागांची पाहणी केली. उपाययोजनाही सुरू आहेत. मनपाचा एक एल अॅण्ड टी कंपनीचा एक असे दोन फिरते दवाखाने कार्यरत आहेत. मनपा आरोग्य केंद्रांची लवकरच सुधारणा करण्यात येईल.'' संग्रामजगताप, महापौर
तोकड्या उपाययोजना
बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासह मनपाची शहरात सात आरोग्य केंद्रे असूनही कावीळ झालेल्या हजारो रुग्णांना खासगी रुग्णालयांत महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. कावीळ झालेल्या महिलांवर उपचार करण्यासाठी मनपा रूग्णालयात कोणतीही सुविधा नाही. आरोग्य केंद्रे नावापुरतीच आहेत. शहरात काविळीसह डेंग्यू, मलेरिया टायफॉईडच्या साथीने थैमान घातले असताना मनपाची रुग्णालयेच आजारी पडल्याने रुग्ण तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
उपचारांसाठी खासगी रुग्णालयांत गर्दी; काविळीच्या हजारो रुग्णांना आर्थिक भुर्दंड;
नागरिकांमध्ये तीव्र संताप
शहरात काविळीच्या साथीची सध्या काय स्थिती आहे, कोणत्या उपाययोजना महापालिकेच्या वतीने सुरू आहेत, याबाबत िवचारणा करण्यासाठी महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांना "दिव्य मराठी'ने बुधवारी दिवसभर वेळोवेळी फोन केला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मनपा उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांच्याशीही "दिव्य मराठी'ने बुधवारी संपर्क साधला, परंतु "मी चार दिवसांपासून रजेवर आहे, मला काहीच माहिती नाही' असे उत्तर त्यांनी दिले.