आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभेच्या उमेदवारीवर ठरणार महापौर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- युती व आघाडीत झालेल्या घटस्फोटाचा अप्रत्यक्ष परिणाम महापालिकेतील राजकीय समीकरणांवर होणार आहे. पुढचे महापौरपद महिलेसाठी राखीव आहे. या पदावर कोण विराजमान होणार याचे गणित विधानसभेच्या उमेदवारीवर ठरणार आहे. सध्या एकत्र असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व अपक्ष नगरसेवक निवडणुकीनंतर एकजुटीने कारभार करतील का, हाही प्रश्न आहे.
नऊ महिन्यांपूर्वी महापालिकेत काँग्रेस आघाडीने सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीचे 18, तर काँग्रेसचे 11 नगरसेवक निवडून आले. पुरेसे संख्याबळ नसतानाही काँग्रेस आघाडीने मनसे व अपक्ष नगरसेवकांना बरोबर घेत सत्ता स्थापन केली. परंतु वर्ष पूर्ण होत नाही, तोच महापौर संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. काँग्रेसच्या ताब्यात असलेली शहर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल की नाही, याचा विचार न करता केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यानुसार जगताप यांनी प्रचार सुरू केला. दरम्यान, गुररुवारी आघाडी तुटल्याचे जाहीर होताच जगताप यांची राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित झाली. शिवाय त्यांच्यासमोर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध झाला. त्यामुळेच महापौर जगताप यांच्यासह आमदार अरुण जगताप भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी अफवा शुक्रवारी दिवसभर शहरात पसरली होती.
एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न
युती-आघाडीतील घटस्फोटानंतर चारही प्रमुख पक्ष आता महापािलकेच्या राजकारणात एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करतील. पुढच्या महिला राखीव महापौरपदी कोण विराजमान होणार याचे गणित आताच मांडले जात आहे. युती व आघाडीत घटस्फोट झाल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या सत्तेत सहभागी असलेले राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे व अपक्ष नगरसेवक एकमेकांना साथ देतील का, असा प्रश्न आहे. एकूणच युती-आघाडीत झालेल्या घटस्फोटाचा अप्रत्यक्ष परिणाम महापािलकेतील आगामी काळातील राजकीय समीकरणांवर होणार आहे.