आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या दहा मिनिटांत गुंडाळली मनपाची सभा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आचारसंहितेचे कारण पुढे करत अनेक दिवसांनंतर बोलावण्यात आलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा सत्ताधाऱ्यांनी बुधवारी अवघ्या दहा मिनिटांत गुंडाळली. सभा तहकूब करता शहरातील प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी धुडकावून लावल्याने आक्रमक झालेल्या विरोधकांनी आयुक्त दिलीप गावडे यांना घेराव घातला. खड्डे बुजवण्याचे काम जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत दालनातून हलणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला. अखेर आयुक्तांनी विराेधकांसह खड्ड्यांची पाहणी केल्यानंतर हा वाद मिटला.
महापौर सुरेखा कदम यांनी बोलावलेल्या सभेच्या विषयपत्रिकेवर काही अार्थिक विषय होते. परंतु नगरपालिकांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे सभा घ्यायची की नाही, याबाबत शासनाकडून अभिप्राय मागवण्यात आला. अखेर सभा घेण्यात आली, परंतु सत्ताधाऱ्यांनी अवघ्या दहा मिनिटांत ती गुंडाळली. सभा तहकूब करता अार्थिक विषयांवर चर्चा करता शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. परंतु ही मागणी धुडकावून लावत सभा तहकूब करण्यात आली. अनेक दिवसांनंतर बोलावण्यात आलेली ही सभा कोणतेही कारण देता गुंडाळण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले.

सभागृहातून बाहेर पडताच विरोधकांनी आयुक्त गावडे यांना आवारात घेराव घातला. सभा तहकूब करण्याचा अधिकार महापौरांचा आहे, त्याबाबत मी काहीच बोलू शकत नाही, असा पवित्रा आयुक्तांनी घेतला. परंतु विरोधकांनी त्यांचे काहीएक ऐकून घेतले नाही. अखेर विरोधकांच्या घेरावातून सुटका करून घेत आयुक्त आपल्या दालनात आले. परंतु विरोधकांनी तेथेही त्यांना घेराव घातला. सभा नेमकी कोणत्या कारणामुळे तहकूब करण्यात आली, याचा जाब विरोधकांनी आयुक्तांना विचारला. सभा तहकूब झाली असली, तरी तुम्ही सभागृह का सोडले, तुम्ही बसून राहिले असते, तर आम्ही सभा चालवली असती. यापूर्वी अशा घटना झालेल्या आहेत. तुम्ही सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम का करत आहात, असा जाब विरोधकांनी आयुक्तांना विचारला. आयुक्तांनी याबाबत स्पष्टीकरण दिले नाही. आरोग्य, कचरा, खड्डे, पाणी असे अनेक प्रश्न असताना त्यावर चर्चा होऊ देता सत्ताधाऱ्यांनी सभा तहकूब केल्याने विरोधकांनी आयुक्तांना चांगलेच खडे बोल सुनावले.

नगर शहराच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी विरोधक आयुक्तांच्या दालनात ठाण मांडून बसले.
सभा तहकूब करता शहराच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी करताना विरोधी नगरसेवक. खड्ड्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी हाताला डोक्याला असे बॅन्डेज बांधले होते.

विरोधी पक्षनेता निवडण्याची मागणी
सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक संजय घुले यांनी विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांनी मात्र त्याकडे कानाडोळा करत सभा तहकूब केली. विरोधी पक्षनेत्याची तातडीने निवड करा, अशी मागणी विरोधक मागील काही दिवसांपासून करत आहेत. विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांची निवड करावी, असे पत्रही देण्यात आले आहे.

डोक्याला बँडेज बांधून नोंदवला निषेध
माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर, माजी सभागृह नेते कुमार वाकळे, नगरसेवक स्वप्निल शिंदे, अारिफ शेख, सुनील कोतकर आदींनी डोक्याला हाताला बॅण्डेज बांधून प्रशासन सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला. बारस्कर यांनी डोक्याला पट्टी बांधली होती. खड्ड्यांमुळे आमची डोकी फुटली, हात-पाय मोडले असा संदेश त्यांनी त्यातून दिला.

आयुक्तांना बळजबरी नेले पाहणीसाठी
शहराच्या प्रश्नांवर चर्चा होऊ देता सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे आता तुम्हीच आमचे प्रश्न सोडवा, अशी मागणी विरोधकांनी आयुक्तांकडे केली. खड्ड्यांचा प्रश्न गंभीर आहे, तुम्ही खड्ड्यांची पाहणी करून लगेच काम सुरू करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. आयुक्त मात्र पाहणी करण्यास तयार नव्हते. अखेर विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून आयुक्त पाहणीसाठी तयार झाले. त्यानंतर आयुक्त विरोधकांनी दिल्ली दरवाजा येथील खड्ड्यांची पाहणी केली. खड्ड्यांचे काम निकृष्ट असल्याचे विरोधकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर अायुक्तांनी संबंधित ठेकेदारास नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

आयुक्त गावडेंवर सत्ताधाऱ्यांचा दबाव
प्रशासन सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालते. आयुक्तांवर दबाव आणून सत्ताधारी चुकीची कामे करत आहेत. मूलभूत सुविधांच्या कामात आडकाठी आणली नसती, तर ही कामे मार्गी लागली असती. सत्ताधारी प्रशासनाला वाढत्या प्रश्नांची भीती वाटते. त्यामुळे सभा तहकूब करण्यात आली, असे आरोप विरोधकांनी केले. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...