आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातशे एकर जागेवर लवकरच मनपाचे नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पिंपळगाव माळवी येथील सातशे एकर जागेवर लवकरच महापालिकेचे नाव लागेल, असा दावा स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांनी गुरूवारी केला. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपळगाव माळवी येथील सातशे एकर जागेवर मनपाचे नाव लावण्याची कार्यवाही अनेक दिवसांपासून रखडली आहे. संबंधित जागेवर मनपाचे नाव लावण्याचे आदेश खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात लक्ष घालून नाव लावण्याची कार्यवाही पूर्ण करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. शिवसेना उपनेते अनिल राठोड महापौरांशी याबाबत चर्चा झालेली आहे. त्यापार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे झाले अाहे. त्यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महापौरांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार असून नाव लावण्याबाबत ज्या अडचणी असतील, त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

सातशे एकर जागेवर महापालिकेचे नाव लागले, तर शहराचा मोठा फायदा होणार आहे. या जागेतून महापालिकेला मोठे उत्पन्न मिळेल. त्यामुळे नाव लावण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शहर बससेवेचा प्रश्न ठेकेदाराच्या इशाऱ्यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत बोलताना जाधव म्हणाले, शहर बससेवेसाठी महापालिकेच्या मालकीच्या बस खरेदी करण्याचा प्रस्तावदेखील शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणार अाहे. जी मोठी कामे रखडलेली आहेत, ती प्राधान्याने मार्गी लावण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...