आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Standing Committee Member Of Selection In Ahmednagar

अहमदनगर मनपाच्या स्थायी समितीवर नवीन 8 सदस्यांची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका स्थायी समितीच्या निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड गुरूवारी करण्यात आली. महापौर संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. नवीन सदस्यांमध्ये शिवसेनेचे अनिल बोरुडे, छाया तिवारी, विद्या खैरे, भाजपचे श्रीपाद छिंदम व उषा नलावडे, राष्ट्रवादीचे समद खान, काँग्रेसच्या रुपाली वारे व मनसेचे गणेश भोसले यांचा समावेश आहे.

स्थायीचे १६ पैकी ८ सदस्य ३१ जानेवारीला सोडत पध्दतीने निवृत्त झाले. सभापती किशोर डागवाले, दत्ता कावरे, नंदा साठे, उमेश कवडे, शारदा ढवण, सुनीता मुदगल, बाळासाहेब बोराटे व फय्याज शेख या सदस्यांना बाहेर पडावे लागले. नवीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेत प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी बंद पाकिटात महापौरांकडे नावे दिली. नवनियुक्त सदस्यांचा महापौर जगताप व उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्थायीचे सोळा सदस्य सभापतिपदाची निवड करणार आहेत. या पदावर कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुन्हा मनसेचाच सभापती होणार, असा दावा डागवाले यांनी केला होता. डागवाले यांच्या जागी गणेश भोसले यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे भोसले हे या पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.
यावर्षी स्थायीविनाच मनपाचे अंदाजपत्रक
मागील वर्षी प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर स्थायीच्या सभेत तब्बल चार-पाच दिवस चर्चा झाली. यावर्षी मात्र स्थायी समिती सभापतिपदाची निवड पूर्ण न झाल्याने प्रशासन अंदाजपत्रक महासभेसमोर मांडणार आहे. त्यासाठी १८ फेब्रुवारीला महासभा बोलावण्यात आली आहे. प्रशासनाने कर वाढ सुचवल्यामुळे २० फेब्रुवारीपूर्वी अंदाजपत्रक मंजूर करावे लागणार आहे.