आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Water Supply Scheme,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणी योजनेची वीज दुरुस्ती लगेच करा- अभियंता दत्तत्रेय कोळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या वीजपुरवठ्यात वारंवार होणारा बिघाड तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश महावितरणचे अधीक्षक अभियंता दत्तात्रेय कोळी यांनी संबंधित अधिका-यांना दिले. शनिवारी (21 जून) शटडाऊनच्या वेळेत दुरुस्तीची रखडलेली कामे मार्गी लावण्यास त्यांनी सांगितले.
महापौर संग्राम जगताप यांनी मनपा पदाधिकारी व महावितरणच्या अधिका-यांसमवेत वारंवार बिघाड होणा-या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी कोळी यांनी हे ओदश दिले. थोड्याशा वादळवा-याने व पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणा-या योजनेची वीज खंडित होते. 16 जून रोजी महापौर जगताप, पदाधिकारी व नगरसेवकांनी अधीक्षक अभियंत्यांना भेटून यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी संयुक्त पाहणी करून तातडीच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले होते.

एमआयडीसीतील एक्स्प्रेस फीडरपासून या पाहणीला सुरुवात झाली. पोल स्ट्रक्चरवरील जम्प कमकुवत झाल्याचे कोळी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. नागापूर पंपिंग स्टेशनपर्यंतचे कंडक्टर बदलण्याची कार्यवाही शनिवारी करण्याच्या सूचना यावेळी कोळी यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. मुळा धरणापर्यंत 30 किलोमीटर अंतरापर्यंत दर दहा किलोमीटरवर बे्रकर टाकण्याच्या सूचनाही कोळी यांनी दिल्या. यामुळे तातडीने बिघाड सापडण्यास मदत मिळणार आहे.

विजेच्या खांबांवरील तारांवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे नियोजन करण्याचे यावेळी ठरले. एमआयडीसी एक्स्प्रेस फीडर, मुळा धरण, नागापूर व विळद येथील उपकेंद्रांची पाहणी करण्यात आली. नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अजिंक्य बोरकर, आरिफ शेख, महादेव काकडे, विलास सोनटक्के, बाळासाहेब सावळे आदी यावेळी उपस्थित होते.