आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्ख्या भावाचा विहिरीत ढकलून खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शेतातील सामुदायिक विहिरीच्या वादातून सख्ख्या भावाचा विहिरीत ढकलून खून करण्यात आला. ही घटना नगर तालुक्यातील नांदगाव येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रेय हरिभाऊ पुंड (67, नांदगाव, ता. नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दत्तात्रेय व त्यांच्या भावाच्या कुटुंबामध्ये विहिरीवरुन वाद होते. शुक्रवारी दुपारी त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. पाराजी हरिभाऊ पुंड, विक्रम पाराजी पुंड, अशोक पाराजी पुंड व गयाबाई पाराजी पुंड यांनी दत्तात्रेय यांना विहिरीत ढकलून दिले. दत्तात्रेय यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.