आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचा खून; गुन्ह्यातून सासू, सासऱ्यास वगळले,मृत महिलेच्या भावाची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विवाहितेचा खून करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात पतीसह एका वाहनचालकाविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नोंद आहे. मात्र, या गुन्ह्यात तिच्या सासू सासऱ्यांचे नाव वगळण्यात आल्याची तक्रार विवाहितेचा भाऊ राजेंद्रकुमार भाऊसाहेब लांडगे यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना दिले आहे.
राजेंद्र लांडगे यांची बहीण अश्विनी मच्छिंद्र अकोलकर यांचा खून झाला. ज्या वाहनातून तिचा मृतदेह नेण्यात आला, त्या वाहनचालकाने स्वत:हून या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला. हा प्रकार समजल्यानंतर आपण पोलिसांत फिर्याद देण्यास गेलो होतो, पण आपली फिर्याद घेण्यात आली नाही, असे लांडगे यांनी गृहराज्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अश्विनीच्या पतीला अटक झालेली नाही. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपास प्रक्रियेवर लांडगे यांनी संशय व्यक्त केला. याप्रकरणी बहिणीच्या सासू, सासऱ्यासही आरोपी करावे, आरोपींना त्वरित अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना आवश्यक त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले.
बातम्या आणखी आहेत...