आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेच्या आत्महत्येला मिळाली वेगळी कलाटणी, पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- रोहिणी कैलास गरगडे (वाकोडी फाटा, दरेवाडी, ता. नगर) या विवाहितेच्या आत्महत्येला वेगळी कलाटणी मिळाली. रविवारी सायंकाळी भिंगार पोलिसांनी तिच्या पतीसह शेजाऱ्याला अटक केली. पतीनेच तिचा खून केल्याचा कबुली जबाब शेजारी राहणाऱ्याने दिला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले.
रोहिणीचा विवाह 5 वर्षांपूर्वी कैलासशी झाला. घर बांधण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणावेत, अशी मागणी कैलास व सासरा भाऊसाहेब तिच्याकडे करत. या छळाला कंटाळून रोहिणीने गळफास घेत आत्महत्या केली, अशी फिर्याद तिच्या वडिलांनी दिली. पोलिसांनी गरगडे यांचा शेजारी सचिन पंडित ऊर्फ पंढरीनाथ राहिंज (19) व रोहिणीचा पती कैलास या दोघांनाही अटक केली. सचिनने विशेष कार्यकारी अधिका-यांसमोर दिलेल्या कबुली जबाबात सांगितले की, रोहिणीला फाशी देण्यासाठी कैलासने आपल्याकडूनच नायलॉनची दोरी नेली. नंतर स्वखुशीने आत्महत्या करत असल्याचे लिहून घेतले. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात खुनाचे वाढीव कलम लावले आहे.