आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुर्‍हाडीचे वार करून वृद्धेचा खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - घरकाम करणार्‍या राधाबाई गोदे या 70 वर्षांच्या वृद्धेच्या डोक्यावर कुर्‍हाडीचे घाव घालून नंतर दोरीने गळा आवळून निर्घृण खून करण्याची घटना एकदरा या आदिवासी गावातील चंदगीरवाडी येथे बुधवारी (1 ऑगस्ट) दुपारी दीडच्या सुमारास घडली. खून करणार्‍या ज्ञानेश्वर शिवराम घोरपडे यास अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी भागाबाई काळू भांगरे (60) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी घोरपडे हा राधाबाईंच्या घरी गेला होता. त्याची पत्नी नांदत नसल्याने राधाबाई त्यास समजावून सांगत होत्या. त्याचा राग आल्याने घोरपडे याने वृद्धेच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार करण्यास सुरुवात केली. राधाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असताना दोरीने त्याने त्यांचा गळा आवळला. नंतर तो शांतपणे तेथून निघून गेला. या घटनेची माहिती मिळताच राजूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक एम. एस. कासार यांच्यासह रावसाहेब शेंडगे, विजय परदेशी, शिवाजी फटांगरे, रंगनाथ साळुंके यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीला काही तासांतच अटक करण्यात त्यांना यश आले. घोरपडे याने गुन्हा कबूल केला असून पोलिस चौकशी करीत आहेत.