आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबरी चोरीसह वृद्धाचा खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जबरीचोरी करुन वृद्धाचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रमेश मोतीलाल काळे (३८, मोहरवाडी, कोळगाव, ता. श्रीगोंदे) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर यांनी बुधवारी दुपारी ही शिक्षा सुनावली. नोव्हेंबर २०१२ मध्ये श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव शिवारात हा गुन्हा घडला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील गोरख मुसळे यांनी काम पाहिले.
घारगावातील खोमणे मळ्यात राहणाऱ्या कुसुम दत्तात्रेय वेठेकर कुटुंबीयांसह घरात झोपल्या होत्या. रमेश काळे त्याच्या साथीदारांनी मध्यरात्री पडवीच्या दरवाजाचे कुलूप तोडून वेठेकर यांच्या घरात प्रवेश केला. कुसुम, त्यांचे पती दत्तात्रेय सासरे शंकर वेठेकर यांना काळे त्याच्या साथीदारांनी लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत शंकर वेठेकर गतप्राण झाले, तर कुसूम त्यांचे पती गंभीर जखमी झाले. काळे त्याच्या साथीदारांनी मोबाइल हँडसेट, घड्याळ, सोन्या-चांदीचे दागिने रोकड असा ७२ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण २० साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादीचा जबाब, पंच, साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.