आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंध पाहिल्याने नणंदेचा खून, भावजयीसह आरोपींना 6 दिवसांची पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - भावजयीचे अनैतिक संबंध पाहिल्याने नणंदेला आपला जीव गमवावा लागला. ही घटना भंडारदरा धरणाजवळच्या जहागीरदारवाडी येथे आदिवासी भागात घडली. राजूर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. फसाबाई गोगा खाडे असे मृत मुलीचे नाव आहे. दरम्यान, बुधवारी आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. 
 
२७ सप्टेंबरला सकाळी महाविद्यालयात जाते, असे सांगून ही मुलगी घरातून बाहेर पडली. नंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीची आई ठकुबाई खाडे यांनी दाखल केली. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने या मुलीचा तिची भावजय, भावजयीचा प्रियकर प्रियकराच्या मित्राने अज्ञात ठिकाणी नेऊन खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह गोणीत भरून इंदोरे (ता. इगतपुरी) येथील वंगणाचा डोंगर शिवारात वाघाच्या गुहेत फेकला. 
 
आरोपींची नावे नामदेव खाडे (वय २९), अनिता खाडे (वय २९) गणेश खाडे (वय १९) अशी आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी मृत मुलीच्या भावजयीचे अनैतिक संबंध असल्याचे या मुलीने पाहिल्याने गावात बोंब होईल म्हणून नामदेव, त्याचा मित्र गणेश अनिता खाडे यांनी मुलीचा काटा काढल्याची कबुली दिली. 

संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना ताब्यात घेऊन घटनास्थळी नेऊन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. नातेवाईकांनी मृतदेह ओळखला. आरोपी नामदेव खाडे हा शेळ्या वळणारा असल्याने त्याला इंदोरे येथील वाघाची गुहा माहीत होती. मुलीला वाघाने मारले असा बनाव करण्याचे आरोपींचे नियोजन होते. 
बातम्या आणखी आहेत...