आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकारात्मक बातमी: अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड - अनैतिकसंबंधाच्या संशयावरून दोघांचा खून झाला. ही घटना सदाफुले वस्तीवर शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी सादिक शहबाज शेख (५०, कुर्ला नेहरूनगर, मुंबई) यास पोलिसांनी अटक केली आहे. महेमुदा सादिक शेख (४०) सईद महेबूब शेख (४५, कुर्ला नेहरूनगर) अशी मृतांची नावे आहेत. बीएसएनएल कार्यालयासमोर लाकडी वखारीजवळ सादिक शहाबाज शेख याने राहत्या घरात महेमूदा सईद महेबूब यांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून दगडाने ठेचून खून केला. पोलिसांनी सादिक शहाबाज शेख यास ताब्यात घेतले. या घटनेची माहिती गुडमॉर्निंग पथकातील उपनिरिक्षक संजय मातोंडकर पोलिस नाईक हसन शेख यांनी निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांना दिली. अधीक्षक सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय अधीक्षक विजय लगारे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शशिराज पाटोळे, सहायक निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली.