आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा हजार जणांनी गायले राष्ट्रगीत, परदेशी गायकांनीही घेतला सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रत्येकाच्या हातात कागदी राष्ट्रध्वज आणि भारताचा जयजयकार, मोठ्या स्क्रीनवर लता मंगेशकरच्या सुरेल आवाजात राष्ट्रगीताची धून सुरू झाली आणि एका सुरात उपस्थित पंधरा हजार लोकांनी राष्ट्रगीत गायला सुरुवात केली. यामध्ये परदेशी अनेक गायकही सहभाग झाले.
हा प्रसंग होता नगर शहरातील क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर खिस्ती मंडळी व मन्ना ग्रूप ऑफ मिनीस्त्रीजच्या वतीने आयोजलेल्या अांतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचा. यावेळी सर्व वातावरण देशप्रेमाने भारावून गेले होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर नगरमधील युवक - युवतींनी समूहगीत सादर केले. रेव्हरंड के. सी. जोयसन यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, प्रत्येक महोत्सवात राष्ट्रगीत म्हटले जाते. आज कनिका व विजेता केळकर यांच्यासह नॉर्वे देशातील रुनी एडव्हर्डसन व अनेक परदेशी गायक व गायिका, वर्सीस जॉन, दयानिधी राव, मास्टर यशपाल, ब्र विन्सेट, अजिंक्य पवार, कॅमेरान मेल्डीस यांनी गीते सादर केली. नंतर येशुवा बंड यांनी संगीत वाद्ये सादर केली. विविध राज्यांतील गायकांनी गीते सादर केल्यावर पुणे येथील बेथेल कव्हिनेट चर्चच्या युवक - युवतींनी महाराष्ट्रीयन नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी श्रोत्यांनी जल्लोष केला. आधुनिक साउंड सिस्टम व विविध प्रकारची वाद्ये संगीत प्रेमीना खूपच भावले.