आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Music Program News In Marathi, Hariprasad Chourasiya Music Program At Nagar, Divya Marathi

.पं. हरिप्रसाद चौरसिया रविवारी नगरमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन, पंडित विजय घाटे यांचे तबलावादन आणि पंडित संजीव अभ्यंकर यांचे भावपूर्ण गायन एकाच मंचावर अनुभवण्याची संधीं नगरच्या रसिकांना येत्या रविवारी (2 मार्च) मिळणार आहे. अनुनाद फाउंडेशनच्या ‘अनुभूती’ या कार्यक्रमात हा दुग्धशर्करा योग जुळून येईल.

मागील तीन वर्षांपासून ‘अनुनाद’ने अनेक दिग्गज कलावंतांचे कार्यक्रम नगर शहरात घडवून आणले. नगर-मनमाड रस्त्यावरील संजोग लॉन्सवर रविवारी सायंकाळी सहा वाजता सुरू होणारी ही मैफल त्याचा शिरपेच ठरेल, असे अनुनादचे तन्मय देवचके व कल्पेश अदावंत यांनी सांगितले.

पंडित चौरसिया हे जागतिक कीर्तीचे कलाकार असून त्यांच्या सुरेल बासरीवादनाने जगभरातील रसिकांना मोहिनी घातली आहे. अनेक प्रतिष्ठित महोत्सवात त्यांनी आपली कला सादर केली आहे. सिलसिला, लम्हे, चाँदनी, डर आदी चित्रपटांत त्यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांच्या साथीने शिवहरी या नावाने दिलेले संगीत आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नुकताच पद्र्मशी सन्मान प्राप्त झालेले पंडित विजय घाटे त्यांना तबल्याची साथसंगत करणार आहेत.

प्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे यावेळी पंडित चौरसिया यांचे चित्र रेखाटणार आहेत. पूर्वार्धात पंडित जसराज यांचे पट्टशिष्य पंडित संजीव अभ्यंकर यांचे सुरेल गायन होईल. अभंग, भक्तिगीते ते सादर करतील. त्यांना हार्मोनियमवर तन्मय देवचके, तबल्यावर अजिंक्य जोशी व पखवाजवर ओंकार दळवी साथसंगत करतील. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख करणार आहेत. ते गेली 25 वर्षे पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवाचे निवेदन करत असून त्यांच्या आठवणी व खुमासदार किश्शांमुळे मैफल अधिकच रंगत जाते.

नवीन भक्तिरचना
या मैफलीत पंडित संजीव अभ्यंकर काही नवीन भक्तिरचना सादर करणार आहेत. मागील वर्षी सवाई गंधर्व महोत्सवात त्यांनी केलेल्या गायनाला रसिकांनी मोठी दाद दिली होती. ‘अनुनाद’च्या वतीने यापुढेही असेच दज्रेदार कार्यक्रम सादर केले जातील, असे तन्मय देवचके, कल्पेश अदवंत व अँड. किशोर देशपांडे यांनी सांगितले.