आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लीम समाजातील युवकांचा भाजपत प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - येथील मुस्लीम युवकांनी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नेतृत्व मान्य करत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार मुरकुटे यांना साथ देण्याचा निर्धार या युवकांनी यावेळी व्यक्त केला. 
 
मुस्लीम समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास आमदार बाळासाहेब मुरकुटे उपस्थित होते. भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, डॉ. लक्ष्मण खंडाळे, माजी सरपंच शफी इनामदार, युवा कार्यकर्ते अल्ताफ पठाण, ज्येष्ठ नेते रहेमानभाई पिंजारी, सूर्यकांत नळकांडे, वास्तूविशारद सुनील वाघ यावेळी उपस्थित होते. 

आमदार मुरकुटे यांचा मुस्लीम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नेते रहेमानभाई पिंजारी यांनी प्रास्ताविक केले. व्यापारी सेलचे अध्यक्ष राजेंद्र मुथ्था यांनी स्वागत केले. भाजपचे सरकार असल्याने नेवासे शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्वजण एकत्र आलो असल्याचे मुस्लीम युवकांनी सांगितले. मुरकुटे म्हणाले, माझ्यावर विश्वास टाकून मुस्लीम युवक माझ्या पाठीशी उभे राहिले. तुमच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. मुस्लीम समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहिन.