आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Organizations In The United Protest Issue At Nagar

मुस्लिम संघटनांची संयुक्त निदर्शने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जवखेडे हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शहरातील विविध मुस्लिम संघटनांनी एकत्र येऊन जिल्हािधकारी कार्यालयासमोर गुरूवारी निदर्शने केली.

जमाते इस्लामी हिंद, जमीयते उलमा हिंद, जमीयते अहेले हदीस, मुव्हमेंट फॉर पिस अॅण्ड जस्टीस, मुकुंदनगर विकास समिती या संघटनांनी दलित हत्याकांडाचा निषेध नोंदवला. घटना होऊन तीन आठवडे उलटले, तरी आरोपी सापडलेले नाहीत. पोिलसांना तपासासाठी वेळ मिळावा, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये, यासाठी मुस्लिम संघटनांनी आंदोलने केली नाहीत. परंतु पुरेसा वेळ मिळूनही पोिलसांना आरोपींचा तपास लागत नाही. त्यामुळे विविध मानवतावादी संघटनांनी एकत्र येत निषेध नोंदवला. जिल्हा अत्याचारग्रस्त घोषित करावा, गावपातळीवर अत्याचार निवारण समित्या स्थापन कराव्यात अशा अनेक मागण्या या संघटनांनी केल्या. यावेळी अर्शद शेख, इरशाद मौलाना, अंजुम मुल्ला, अन्सार सय्यद, अब्दुल रहीम, कलीम मर्चंट, अनिस शेख, अनंत लोखंडे, अॅड. अरुण जाधव, सुभाष लांडे आदी उपस्थित होते.