आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मेरा देश, मेरा अपना घर' आंदोलन, झुकेरबर्गचे केले कौतुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या मैदानावर रविवारी दुपारी बेघर नागरिकांच्या उपस्थितीत "मेरा देश, मेरा अपना घर' आंदोलन करण्यात आले. देशातील बेघर कुटुंबांना घर बांधण्यासाठी प्रत्येकी एक गुंठा भूमी मिळावी, रोजीरोटी निवारा मिळावा हा अधिकार भारतीय घटनेच्या मूलभूत अधिकारात समाविष्ट करावा, या मागणीसाठी अॅड. कारभारी गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी अॅड. गवळी म्हणाले, संविधानाच्या कलम २१ अन्वये सर्वोच्च न्यायालयाने रोजीरोटी निवाऱ्याचा अधिकार मूलभूत अधिकारात धरला, पण तो मर्यादित आहे. त्यावेळी लोकसंख्या विस्फोटाचे गांभीर्य राज्यकर्त्यांच्या लक्षात आलेले नव्हते. निदान आता तरी ते लक्षात घेऊन वेळीच पावले उचलण्याची नितांत गरज आहे. केंद्रातील गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी २०२२ अखेर बेघरांना घरे देऊ, असे जाहीर केले आहे. परंतु ही घोषणा फसवी असून तत्पूर्वीच सरकार बदलणार आहे. त्यामुळे या दोघांना "नापास मंत्री' अशी उपाधी देण्यात आली. यावेळी प्रकाश थोरात, अशोक सब्बन, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, अशोक शिंदे, संतोष लोंढे, नाना दोंदे यांच्यासह बेघर नागरिक उपस्थित होते.

झुकेरबर्गचे कौतुक, विश्वातील प्रथम कुटुंब
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग त्यांची पत्नी प्रीसिला यांनी आपली मुलगी मॅक्सिका हिच्या जन्माचे औचित्य साधून आपली संपत्ती जगाला दान करण्याची घोषणा केली. तब्बल ९९ टक्के संपत्ती जगाला देण्यात येणार आहे. त्यामुळे हे कुटुंब "विश्वातील प्रथम कुटुंब' म्हणून घोषित करून त्यांना या वेळी आंदोलकांनी मानवंदना दिली.
बातम्या आणखी आहेत...