आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांवर शाई फेकणारा वाल्हेकर ‘आप’मध्ये दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर शाई फेकणारा भाजपचा पारनेर तालुका सरचिटणीस नचिकेत वाल्हेकर ‘आप’मध्ये दाखल झाला. केजरीवाल यांच्या त्यागी भूमिकेमुळे आपण पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगत वाल्हेकरने खासदार दिलीप गांधींवर टीका केली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल अण्णा हजारे यांच्या नावाचा वापर करत असल्याने वाल्हेकरने पत्रकार परिषदेत ‘अण्णा हजारे जिंदाबाद’च्या घोषणा देत केजरीवाल यांच्या अंगावर शाई फेकली होती.

हे प्रकरण देशभर गाजले. दरम्यान, नंतर वाल्हेकरचे मन:परिवर्तन झाले. केजरीवाल यांचे ‘स्वराज्य’ पुस्तक आपण वाचले असून भ्रष्टाचार मिटवण्यासाठी त्यांची मोठी तळमळ आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला. त्यांची भूमिका भावल्याने आपण ‘आप’मध्ये प्रवेश केल्याचे वाल्हेकरने सांगितले. दिल्लीत राजमोहन गांधी यांच्या उपस्थितीत वाल्हेकरने ‘आप’मध्ये प्रवेश केला.