आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिजळगाव चौफुला जवळ बस - ट्रकची धडक; 17 जण जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - एसटी व ट्रकची धडक होऊन 17 प्रवासी जखमी झाले. हा अपघात कर्जत तालुक्यात नगर-सोलापूर महामार्गावर माहिजळगाव चौफुला येथे रविवारी दुपारी 3 वाजता झाला.

कर्जतहून जामखेडकडे जाणारी एसटी (एमएच 12 एव्ही 9351) व सोलापूरहून नगरच्या दिशेने जाणारा ट्रक (टीएन 52- 8778) यांची धडक झाली. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. प्रवासी घाबरून गेले. अपघात झालेल्या ठिकाणापासून दोन मिनिटांच्या अंतरावर डॉ. राजेश तोरडमल यांचे हॉस्पिटल असल्याने जखमी प्रवाशांना तेथे नेण्यात आले. गंभीर जखमींना नगरला आणले. या प्रवाशांची नावे : लक्ष्मण बाबूराव बेंद्र (बीड), छबाबाई उत्तम पवार (नगर), मंदाबाई नामदेव जगदाळे, झुंबरबाई भोरे, रामकिसन कठाळे, अंकुश मोहळकर (नान्नज), महेंद्र यादव. किरकोळ जखमींमध्ये ऋषिकेश वाघमारे, तुकाराम वाघमारे, भागुबाई काळे, अंजना काटे, दिगंबर काटे, रामा मानकर, बबन पवार, साखरबाई हणवार, रुख्मिणी राळेभात, पुष्पा वाघमारे यांचा समावेश आहे.

एसटी बसचालक शिवराम नारायण काकडे यांनी मिरजगाव दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. ट्रकचालक फरार असल्याने त्याचे नाव समजले नाही. जामखेड आगाराची ही बस आहे.