आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशवाणी साजरा करणार रौप्य महोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - "बोलकंवृत्तपत्र' म्हणून ओळखलं जाणारं नगर आकाशवाणी केंद्र येत्या १४ एप्रिलला रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या वर्षभरात विविध सांस्कृतकि कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याची सुरूवात १३ एप्रिलपासून करण्यात येत आहे, अशी माहिती कार्यक्रम प्रमुख प्रदीप हलसगीकर यांनी गुरूवारी दिली.

१४ एप्रिल १९९१ रोजी नगर आकाशवाणी केंद्राचे उद््घाटन झाले. सावेडीत असलेले हे केंद्र गेल्या २४ वर्षांत नगरकरांच्या सांस्कृतकि घडामोडींचे केंद्र बनले आहे. कला, संगीत, नाट्य याबरोबरच इतिहास, शेती, ग्रामीण वकिास यासाठी नगर केंद्राने बहुमोल योगदान दिले. येत्या १४ ला हे केंद्र रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त पुढील वर्षभरात अनेक नवीन कार्यक्रमांची निर्मिती करण्यात येणार आहे, तसेच शहर तालुक्यांच्या ठकिाणी विविध स्टेज शो आयोजित करण्यात येतील, अशी माहिती हलसगीकर यांनी दिली.

येत्या सोमवारी (१३ एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजता सावेडीतील माउली सभागृहात रौप्य महोत्सवी वर्षारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने सुगम संगीताची सुश्राव्य मैफल होणार आहे. प्रसिद्ध गायक राजेश दातार, मंजिरी आलेगावकर अनुराधा कुबेर भावगीते सादर करतील. त्यांना तबल्यावर पुण्याचे राजू जवळकर, हार्मोनियमवर तन्मय देवचके व्हायोलिनवर रमाकांत परांजपे साथसंगत करतील.

जिल्हाधकिारी अनिल कवडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. त्यांच्या हस्ते नगर आकाशवाणीच्या माजी केंद्रप्रमुखांचा सत्कार करण्यात येईल. रसकिांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आकाशवाणी केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

सावेडीतील अहमदनगर आकाशवाणी केंद्राची सुसज्ज वास्तू. छाया: उदय जोशी