आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक जवळ आल्याने नगरसेवक लागले कामाला!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने विविध विकासकामांची भूमिपूजने करण्याची धांदल उडाली आहे. बंदपाइप गटार, रस्ते, ड्रेनेज, पथदिवे यासारखी कामे सुरू करून नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न नगरसेवक करत आहेत. प्रभागात आतापर्यंत किती विकासकामे झाली, हे सांगत उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधी देत आहेत.

प्रभाग 60 मध्ये पथदिवे
प्रभाग 60 पथदिव्यांनी उजळून निघाला आहे. उर्वरित प्रस्तावित कामे येत्या दोन महिन्यांत पूर्ण होतील, अशी माहिती नगरसेवक गणेश भोसले यांनी समता कॉलनीत पथदिवे बसवण्याच्या प्रसंगी दिली. यावेळी भाऊसाहेब फुलसौंदर, डी. डी. शिंदे आदी उपस्थित होते. भोसले म्हणाले, सर्व परिसराचा समान विकास साधला जात आहे. वाढत्या वसाहतींचा विचार करून विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहेत.

प्रभाग 49 मध्ये ड्रेनेजचे काम सुरू
प्रभाग 49 मध्ये नगरसेविका नंदा साठे यांच्या प्रयत्नांतून ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रसिक बोरा यांच्या हस्ते कामाला प्रारंभ झाला. याप्रसंगी लक्ष्मीकांत जाजू, विपुल गुगळे, अशोक कोठारी, रामबिलाल बिहाणी, वसंत कटारिया, डॉ. नंदू मंत्री, कांतिलाल फिरोदिया आदी उपस्थित होते. स्थायी समितीचे माजी सभापती मनेष साठे म्हणाले, आतापर्यंत प्रभागात रस्ते, ड्रेनेज, गटारे, पथदिवे, पाणी, सांस्कृतिक भवन या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

सत्कार व सुरभी कॉलनीत बंद पाइपगटार
निर्मलनगर येथील सत्कार व सुरभी कॉलनीतील बंद पाइपगटार कामाचा प्रारंभ नगरसेवक बाळासाहेब पवार, नागेंद्र जाधोर, सीताराम तळेकर, आसाराम दहिफळे, भानुदास गिते, दत्तात्रेय जगताप, दिनकर गिते, सचिन लोटके यांच्या उपस्थितीत झाला. पवार म्हणाले, प्रभागात मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण केले जाणार आहे. प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. बंद पाइपगटार झाल्यावर परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल, असे पवार यांनी सांगितले.