आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणुकीत मोबाइलवर हायटेक प्रचार; अनावश्यक फोन कॉल, SMSची डोकेदुखी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आपण कामात व्यग्र असताना अचानक मोबाइल खणखणतो, त्यावर दिसणारा क्रमांक अनोळखी असतो. फोन घेतल्यानंतर कुठला तरी उमेदवार ‘‘मला निवडून द्या’’ असे आवाहन करतो. असे फोन वारंवार येत असल्याने महापालिका निवडणुकीतील हा हायटेक प्रचार मतदारांसाठी डोकेदुखी बनला आहे.
प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन निवडून देण्याचे साकडे घातले जात आहे. कुटुंबातील सर्व सदस्य घरी नसतात. नोकरदारवर्ग कामानिमित्त सकाळीच घराबाहेर पडलेला असतो. अशा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून प्रचाराचे नवीन फंडे वापरले जात आहेत. बहुतेक मतदारांकडे आता मोबाइल आहेत. त्याचा लाभ उठवत थेट उमेदवारांनी कॉलसेंटरची मदत घेतली आहे. या सेंटरवरून मतदारांना उमेदवाराचे नाव, त्याचे चिन्ह सांगत निवडून देण्याचे आवाहन केले जाते. अवेळी येणारे अनोळखी क्रमांकांवरील हे फोन नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
एसएमएस सुविधेचाही उपयोग राजकीय पक्षांचे उमेदवार करत आहेत. या हायटेक प्रचाराला आळा कसा घालायचा, असा प्रश्न निवडणूक आयोगाला पडला आहे. उमेदवारांना दररोजच्या खर्चाचा हिशेब द्यावा लागतो, पण हायटेक प्रचाराचा हिशेब कसा ठेवायचा, हा खरा प्रश्न आहे.