आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेतर्फे पहिल्या दिवशी 55 उमेदवारांच्या मुलाखती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, शिरीष सावंत, आमदार मंगेश सांगळे, संपर्कप्रमुख सुनील बांभूळकर, संतोष धुरी यांच्या समितीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. दिल्लीगेट परिसरातील पक्ष कार्यालयात या मुलाखती घेण्यात आल्या. दिवसभरात 1 ते 19 प्रभागातील एकूण 55 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. या मुलाखती दोन दिवस चालणार आहेत.
सर्व मुलाखती बाहेरून आलेल्या वरील समितीने घेतल्या. सरासरी एका प्रभागातून चारहून अधिक उमेदवार निवडणूक लढवायला इच्छुक असल्याची माहिती चांडक यांनी पत्रकार परिषदेत दिली. केवळ लेखी परीक्षेचे मार्क हा उमेदवारीचा निकष नाही, असे शिरीष सावंत यांनी स्पष्ट केले. आधीच्या लेखी परीक्षेला काही इच्छुक उमेदवार उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे 21 किंवा 22 नोव्हेंबरला मनसे पुन्हा उर्वरित उमेदवारांची लेखी परीक्षा घेणार आहे. परंतु, प्रत्येक उमेदवाराला लेखी परीक्षा देणे बंधनकारक आहे, असे आमदार सांगळे यांनी सांगितले.
मुलाखतींना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही स्थानिक पदाधिकारी व संपर्कप्रमुखांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे, असे चांडक म्हणाले. या मुलाखतींमधून शहरातील प्रमुख समस्या समोर आल्या. त्यामुळे विकासाच्या मुद्यावरच मनसे निवडणूक लढणार आहे, असेही समितीने स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीत मनसे जास्तीत जास्त जागा लढवणार असल्याचे संकेत या समितीने दिले आहेत. बंडखोरी होणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.