आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एटीएम’मधून तीन लाख लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - एटीएमचा इलेक्ट्रॉनिक लॉक पासवर्ड टाकून मशिन उघडून तीन लाख 2 हजार रुपये काढून घेण्याचा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिंधू मंगल कार्यालय येथील एटीएम सेंटरमध्ये घडला आहे. 12 जानेवारी ते 18 जूनपर्यंत पैसे काढण्यात आले आहेत. अँक्टीव्ह सेक्युअर मॅनेजमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे अर्जुन उत्तमराव वराडे (गारखेडा, औरंगाबाद) यांच्या फिर्यादीवरून राहुल रमेश कोकणे (ढोरवस्ती, बालिकार्शम रस्ता) व गौरव विष्णू भिंगारदिवे यांच्याविरुद्ध कंपनीचा विश्वासघात केल्याचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.