आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन् बस पेटली! जाळपोळीची संबंध नाही - मराठा सेवा संघ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगर शहरातील स्टेट बँक चौकात मंगळवारी सकाळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर पेट्रोल टाकून तारकपूर आगाराची बस जाळण्यात आली. मात्र, या जाळपोळीशी संबंध नसल्याचा दावा मराठा सेवा संघाकडून करण्यात आला. दरम्यान, यात कुठलीही जीवित हानी झाली नसून एसटी महामंडळाचे पाच लाखांचे नुकसान झाले.