आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय पुरस्काराने नगरच्या सीए शाखेचा दिल्लीत गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटस् ऑफ इंडियाच्या नगर शाखेस "अतिशय प्रशंसनीय शाखा' हा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच मिळाला. भारतातील १४९ शाखांमधून नगर शाखेची या पुरस्कारासाठी निवड झाली. नगर शाखेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या अजय मुथा यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना विविध उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल राष्ट्रीय अध्यक्ष के. रघु यांच्या हस्ते नगर शाखेला हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष मनोज फडणीस यांच्यासह पाचही विभागांचे प्रमुख सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुरस्काराबाबत माहिती देताना नगर शाखेचे अध्यख मुथा म्हणाले, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटस् ऑफ इंडियाकडून भारतातील सर्व शाखांना वर्षभर करावयाच्या कार्याचे नियोजन दिले जाते. त्यानुसार केलेल्या कार्याचा अहवाल दिल्ली येथील मुख्य कार्यालयाकडे सादर करावा लागतो. या अहवालाचे अवलोकन करून प्रत्येक कार्यास गुण दिले जातात. त्यानंतर सर्व शाखांच्या कार्याची तुलना करून पुरस्कार जाहीर करण्यात येतात. नगर शाखेने वर्षभर केलेल्या कार्यासाठी पैकीच्यापैकी गुण मिळवले.
नगर शाखेचे साडेतीनशेपेक्षा अधिक सभासद आहेत. नगर शाखेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. "सीए डे'निमित्त रक्तदान शिबिर, अन्न बचाव मोहीम, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, वाया जाणाऱ्या अन्नापासून वीजनिर्मिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शहरात स्मार्ट सिटीबाबत निबंध स्पर्धा, व्हीजन डॉक्युमेंटची मांडणी, सभासदांसाठी दरमहा ई- न्यूज लेटरचे प्रकाशन, नगर शाखेच्या वेबसाईटची निर्मिती, महिला सबलीकरणासाठी विशेष कार्यक्रम, औद्योगिक अभ्यास दौरा असे विविध उपक्रम राबवले. या उपक्रमांचा शहरातील दीड हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या कामाची पावती पुरस्कारामुळे मिळाली आहे.