आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरचा सोनसाखळी चोर पुण्यात पकडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - श्रीरामपूरच्या सोनसाखळी चोरावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अय्याझ बाबुलाल सैय्याद असे त्याचे नाव असून त्याच्या विरोधात येरवडा पोलीस चौकीत गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यातील चंदननगर येथे पायी जात असलेल्या पौर्णिमा संजय घुले यांचे 30 हजार रुपयांचे मंगळसूत्र मोटरसायकलवरून आलेल्या दोन आरोपींनी हिसकावून नेले. त्यानंतर प्रीतम सोसायटीत मंदा हनुमंत कुंभार यांचेही अशाचप्रकारे 60 हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकवण्यात आले. महिलांनी याबाबत पोलीस चौकीत माहिती दिली. यानंतर पेट्रोलिंगवरील पोलिसांनी चोरट्यांच्या पाठलाग केला. मात्र आरोपी मोटारसायकल अंधारात सोडून पळून गेले. या झटपटीत आरोपींची बॅग खाली पडली. पोलिसांनी ती तपासली असता त्यात असलेल्या वाहन परवान्यावरून एक चोरटा अहमदनगरचा असल्याचे निष्पन्न झाले.