आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सोन्याच्या दागिन्यांची धुंदी, चोरांना संधी..’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरात धूमस्टाईलने दागिने लंपास करण्याची फॅशन अनेक भुरट्या चोरांनी अवंलबली आहे. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर उपाय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरात ‘दागिन्याची धुंदी चोरांना संधी’ साखळी चोरांपासून सावध रहा! अशा व्यंग चित्राच्या संदेशाचे फलक लावून जनजागृती केली.

भारतीय संस्कृतीत सोन्यांच्या दागिन्यांना विशेष असे महत्त्व आहे. जास्तीत जास्त सोने अंगावर असणे, हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. मात्र, दागिन्यांच्या प्रतिष्ठेची धुंदी चोरांना संधी देणारी ठरत आहे. महिला रस्त्यावरून जात असताना मोटारसायकलवरून येणारे भुरटे चोर महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून धूम स्टाइलने पसार होतात. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण आणण्यात पोलिस प्रशासनालाही अपयश आले आहे. अशाप्रकारे होणार्‍या चोर्‍यांना लोकसहभागातूनच आवर घालता येईल. यावर उपाय म्हणून मनसेचे नगरसेवक गणेश भोसले यांनी शहरातील प्रभाग क्रमांक 60 मध्ये जनजागृती फलक लावले आहेत.

भोसले म्हणाले, नागरिकांच्या सुरक्षेकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. चोरीच्या अनेक घटना घडूनही पोलिस बघ्यांची भूमिका घेत आहे. रात्रीच्या गस्तीतही अनियमितता होत आहे. प्रभागातील नागरिक सकाळी तसेच सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडतात. धूम स्टाइलने दागिने पळवण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. यावर उपाय म्हणून प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, या उद्देशाने हे फलक लावण्यात आले आहेत, असे भोसले यांनी सांगितले.