आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एकला चलो’चा काँग्रेसचा नारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आगामी महानगरपालिका निवडणुका काँग्रेसने स्वबळावरच लढवाव्यात, या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट करत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी एकला चलोचा नारा दिला आहे.

शहर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शहरात पक्षाची हक्काची मते आहेत. पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. हा वर्ग मतदारांमध्ये बदलण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. बाळासाहेब भुजबळ, अनंत देसाई, सुभाष गुंदेचा, दीप चव्हाण, सविता मोरे, धनंजय जाधव, निखिल वारे, बाळासाहेब भंडारी आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. इच्छुकांसह कार्यकर्त्यांनी प्रभागातच कार्यरत राहून पक्षकार्य करावे. त्यांना निवडणुकीत न्याय देऊ, कोणावरही अन्याय करणार नसल्याचे सारडा यांनी सांगितले. भिंगार छावणी मंडळ व महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली. शुक्रवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समवेत झालेल्या बैठकीत परस्परांवर आरोपांच्या फैरी झाडणार्‍या सारडा व शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी शनिवारच्या बैठकीत एकीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला.