आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपाच्या तिजोरीत एकाच महिन्यात 9 कोटी जमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - संकलित करावर 10 टक्के सवलत दिल्याने एकाच महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 8 कोटी 92 लाख रुपये जमा झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दुपट कर जमा झाला आहे.

संकलित करावर 1 ते 31 मेदरम्यान 10 टक्के, तर 1 ते 30 जूनदरम्यान 8 टक्के सवलत मनपाने जाहीर केली आहे. 10 टक्के सवलतीचा नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात फायदा घेतल्याने एकाच महिन्यात तब्बल 8 कोटी 92 लाख रुपये जमा झाले आहेत. मागील वर्षी हा आकडा केवळ 4 कोटी 72 लाख होता.

शहर, सावेडी, बुरुडगाव रोड व झेंडीगेट अशा चार विभागीय कार्यालयांमध्ये कर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सावेडी विभागाने नागरिकांच्या मागणीनुसार सुटीच्या दिवशीही करभरणा सुरू ठेवला. त्यामुळे या विभागात 3 कोटी 53 लाख असा सर्वांत जास्त कर जमा झाला.
विभागनिहाय भरणा
> सावेडी - 3 कोटी 53 लाख.
> शहर - 2 कोटी 13 लाख.
> झेंडीगेट - 65 लाख .
> बुरुडगाव रोड - 2 कोटी 60 लाख.