आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Development Commendable Idea To Creditable

नगरच्या विकासासाठी सर्वांना एकत्र आणण्याचा विचार स्तुत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरच्या विकासासाठी सर्वांना एकत्र आणून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा नवनीत विचार मंचाचा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे, असे प्रतिपादन महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.
नवनीत विचार मंचाच्या वतीने ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. मुकुंद घैसास, अहमदनगर एज्युकेशन सोसयटीच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया, प्रख्यात चित्रकार अनुराधा ठाकूर ज्येष्ठ अभिनेते मोहन सैद यांना महापौर कळमकर, आयएमएसचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, मराठा चेंबर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर नगर व्यासपीठचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव मिरीकर यांच्या हस्ते नगर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.

शहर बँकेचे अध्यक्ष डॉ. विजय भंडारी, नगर अर्बन बँकेचे संचालक अजय बोरा, उद्योजक कुंदन कांकरिया, अॅड. रवींद्र शितोळे, गणेश गावडे, शिवाजीराव नाईकवाडी, दिलीप जाधव, किरण पवार, प्रा. नवनाथ वाव्हळ, बाबासाहेब सुडके, सतीश शहा आबीद खान आदी यावेळी उपस्थित होते. कळमकर म्हणाले, घैसास, डॉ.कोलते पारगांवकर या मान्यवरांनी केलेल्या सूचना नगरच्या भवितव्याबाबत सर्वांनीच व्यक्त केलेल्या अपेक्षा म्हणजे या सर्वांनी दिलेला होमवर्क आहे असे मी मानतो. विरोधी पक्षात असलो तरी माझा कालावधी कमी असला, तरी नगरकरांच्या या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेन. नवनीतभाईंनी त्यांच्या काळात इतिहास घडवला. मात्र, भाईंच्या काळातील परिस्थिती वेगळी होती. निवडणुका वेगळ्या वातावरणात होत असत. लोकही काम पाहूनच उमेद््वार निवडून देत. मात्र आज वातावरण लोकांची मानसिकता बदलली आहे. नगर म्हणजे खेडं, इथं काहीच होत नाही, ही मानसिकताही बदलली पाहिजे. नगरच्या विकासाठी सर्वांना एकत्र आणून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा नवनीत विचार मंचचा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे, असे कळमकर म्हणाले.

प्रा. घैसास म्हणाले, नवनीतभाईंनंतर कुणी नेता राहिलेला नाही. अाजच्या सर्व वास्तू, योजना त्यांच्याच काळातील आहेत. त्यांच्या काळात मी नगरसेवक होतो. नगरसेवक विरोधात जातील किंवा अडचणी येतील याची भाईंनी कधीच तमा बाळगली नाही. त्यांची धडाडी आजच्या महापौरांनी दाखवावी.

डॉ. कोलते म्हणाले, नगरच्या लोकांची मानसिकता नकारात्मक झाली आहे. चांगले काम करुन ती बदलण्याची गरज आहे. सुधीर मेहता यांनी प्रास्ताविक केले.
पाहुण्यांसमवेत पुरस्कारविजेते मोहन सैद, मुकुंद घैसास, छाया फिरोदिया, अनुराधा ठाकूर.