आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याचा 7045 कोटींचा पतपुरवठा आराखडा मंजूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर जिल्ह्याच्या सन 2013-14 च्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यात प्राथमिक क्षेत्रासाठीच्या तरतुदीत 470 कोटी 47 लाख रुपयांची वाढ करून सुधारित 7045 कोटी 43 लाखांच्या पतपुरवठा आराखड्यास बुधवारी मंजुरी देण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत सुधारित पतपुरवठा आराखड्यास मंजुरी देण्यात आली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय प्रबंधक पी. पी. नाचणकर, जिल्हा व्यवस्थापक व्ही. आर. सोनटक्के, जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक राकेश पांगत यावेळी उपस्थित होते.

आधी 6574 कोटी 96 लाखांचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आला होता. प्राथमिक क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीत 470 कोटी 47 लाखांची वाढ करून 7045 कोटी 43 लाखांचा सुधारित पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला. त्यात 5533 कोटी 50 लाखांची तरतूद प्राथमिक क्षेत्रासाठी व 1511 कोटी 93 लाखांची तरतूद बिगर प्राथमिक क्षेत्रासाठी करण्यात आली आहे. प्राथमिक क्षेत्रांतर्गत पीककर्जासाठी 2416 कोटी 48 लाख, कृषी विकास कर्जासाठी 1461 कोटी 2 लाख असे 3877 कोटी 50 लाख म्हणजे आराखड्याच्या सुमारे 70 टक्के तरतूद करण्यात आली आहे. लघू उद्योगासाठी 561 कोटी 83 लाख, अन्य प्राथमिक क्षेत्रांसाठी 1094 कोटी 17 लाखांची तरतूद प्रस्तावित आहे.