आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखे-भाजप-शिवसेना एकत्र, आज संयुक्त मेळावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्याच्या राजकारणात भाजप काँग्रेस एकमेकांच्या विरोधात असले, तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी विरोधक एकत्र आल्याने चुरस वाढली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे भाजप, शिवसेना यांचा संयुक्त मेळावा रविवारी (३ मे) सकाळी नंदनवन लॉन्स येथे होत आहे, अशी माहिती जिल्हा विकास आघाडीचे अध्यक्ष वसंतराव कापरे भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. भानुदास बेरड यांनी शनिवारी दिली.
दरम्यान, विखे यांनी भाजप शिवसेनेला आपल्याबरोबर घेतल्याने बाळासाहेब थोरात गटाची चांगलीच अडचण झाली अाहे. थोरात गटासाठी ही आता अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
जिल्हा बँकेसाठी मे रोजी मतदान होणार आहे. सत्ता ताब्यात घेण्यासाठी थोरात विखे गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. चुरस वाढलेली असतानाच विखेंनी भाजप शिवसेनेशी जुळवून घेतले आहे. शुक्रवारी रात्री हॉटेल संकेतमध्ये विखे पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या वेळी शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय काँग्रेस, सेना भाजपने या बैठकीत घेतल्याचे समजते. रविवारी विखे यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा विकास आघाडी नगर जिल्हा भाजपचा संयुक्त मेळावा अायोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास पालकमंत्री शिंदे, खासदार दिलीप गांधी, काँग्रेसचे जयंत ससाणे, आमदार शिवाजी कर्डिले, भाऊसाहेब कांबळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, चंद्रशेखर कदम, बबनराव पाचपुते,नंदकुमार झावरे, राजीव राजळे, बिपीन कोल्हे, अण्णासाहेब शेलार, उपमहापौर सुवर्णा कोतकर, अभय आगरकर, अण्णासाहेब म्हस्के, अरुण तनपुरे, सुभाष पाटील आदी उपस्थित राहणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे
.
हितासाठी एकत्र
नगर जिल्हा सहकारी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा विकास आघाडी जिल्हा भाजपचा संयुक्त मेळावा होणार आहे. जिल्हा बँकेच्या सभासदांच्या बँकेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही आमच्या लोकांना निवडून आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत.'' राम शिंदे, पालकमंत्री.