आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३८७ गावांमधील भूजल पातळी घसरली, टँकरला जिल्हाभरातून वाढली मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कमीपावसामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले अाहेत. जिल्ह्यातील ३८७ गावांमधील भूजल पातळी खालावल्याने ऐन हिवाळ्यामध्ये ग्रामीण भागातून पाण्याच्या टँकरला मागणी वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील दोन लाख नागरिकांना ११२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यामध्ये केवळ १० मिलिमीटर जास्त पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यावर टंचाईचे संकट कायम अाहे. दरवर्षी जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात टँकरला मागणी सुरू होते. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापासूनच टँकरला मागणी वाढू लागली.
ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अवघे ६७ टँकर सुरू होते. आता ही संख्या वाढून ११२ झाली आहे. बागायती तालुका असलेल्या संगमनेर तालुक्यात सर्वाधिक २१ टँकर सुरू आहेत.

मे महिन्याच्या अखेरपर्यंत टँकरची संख्या ४७५ वर गेली होती. जिल्ह्यात जूनला मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली. यामुळे टँकरची संख्या काही प्रमाणात घटली होती. ते १५ जूनपर्यंत संपूर्ण जिल्हाभरात चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. तब्बल तीन महिने पावसाने पाठ फिरवली होती. पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. जिल्ह्यातील तब्बल ३८७ गावांतील पाणी पातळी तीन मीटरने घटली. तलाव, विहिरी, कूपनलिका हे पाण्याचे स्रोतही कोरडेठाक पडले होते. यामुळे टँकरच्या मागणीत पुन्हा वाढ होऊ लागली होती.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात लाख नागरिकांना तब्बल ५२१ टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. पाथर्डी, पारनेर तालुक्यात सर्वाधिक पाणी टँकर सुरू होते. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात सप्टेंबरपासूनच परतीच्या पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे पाण्याच्या साठ्यात बऱ्यापैकी वाढ झाली. त्यामुळे टँकरची संख्या कमी होऊ लागली. ३० ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात सुरू असलेले ४५४ टँकर जिल्हा प्रशासनाने बंद केले होते. केवळ ६७ टँकर जिल्ह्यात सुरू होते. त्यानंतर मात्र पुन्हा टँकरच्या मागणीत वाढू होऊ लागली. १२ डिसेंबरपर्यंत टँकरची संख्या ११२ वर जाऊन पोहोचली आहे.

कमी पावसामुळे ३८७ गावांमधील भूजल पातळी मीटरने खाली गेली अाहे. त्यामुळे पाणी टंचाई आणखी वाढली आहे. सर्वाधिक पाथर्डी तालुक्यांमधील ७३ गावांमधील भूजल पातळी मीटरने खाली गेली. भूजल पातळी खालावल्याने जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट कायम राहणार आहे.

रब्बीच्या ९८ टक्के पेरण्या
दोन महिन्यांपूर्वी परतीचा दमदार पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या समाधानकारक पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत लाख ७२ हजार (९८ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ज्वारीच्या लाख ३० हजार ३१० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. त्याखालोखाल हरबरा, गहू, करडई, तीळ, जवस सूर्यफूल या पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...