आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar District Planning Committee Elaection News In Marathi

"डीपीडीसी' निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्याच्याआर्थिक नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) रिक्त झालेल्या चार जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या छाननीत ३१ उमेदवारी अर्ज वैध ठरले. शनिवारी (१४ डिसेंबर) माघारीचा दिवस असल्याने या निवडणुकीचे चित्र शनिवारीच स्पष्ट होणार आहे.
पालकमंत्री हे नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. या समितीच्या चार जागा रिक्त झालेल्या आहेत. या रिक्त जागांसाठी ३०डिसेंबरला निवडणूक होत आहे. यानिवडणुकीत महापालिकेतून तीन सदस्य समितीवर जाणार आहेत.

मनपाच्या तीन जागांसाठी सर्वसाधारण खुला, सर्वसाधारण महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण आहे. मनपाच्या सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सर्वाधिक १० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप काँग्रेसच्या नगरसेवकांनी अर्ज दाखल केले, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गातून चार अर्ज दाखल झाले आहेत.
महापािलकेच्या वेगवेगळ्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या तीन जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. मनपाच्या तीन जागांसाठी सर्वसाधारण प्रवर्गातून २२ अर्ज दाखल झाले आहेत. तर अन्य एक सदस्य निवडीसाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत.
शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छाननीजिल्‍हानिवडणूक िनर्णय अधिकारी अतिरिक्तजिल्‍हाधिकारी शरद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या छाननीत सर्व अर्ज वैध ठरवण्यात आले. मतमोजणी ३१डिसेंबरला होणार आहे.
मनपाचे६८ नगरसेवक मतदान करणार
नगरमहापालिकेतून तीन सदस्यजिल्‍हानियोजन समितीवर जाणार आहेत. या तीन जागांसाठी महापालिकेतील ६८ उमेदवार मतदान करणार आहेत, तर नगरजिल्‍हयातील आठ नगरपालिकांमध्ये एक उमेदवार निवडून द्यावयाचा आहे. यासाठी १७३ नगरसेवक मतदान करणार आहेत.
सर्व अर्ज वैध
*जिल्हािधकारीकार्यालयातील प्रियदर्शनी हॉल येथे उमेदवारी शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यानिवडणुकीत चार जागांसाठी एकूण ३१ अर्ज दाखल झाले होते. सर्व उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सकाळी झाली. छाननीत सर्व अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत.” वामनकदम, सहायकिनवडणूक िनर्णय अधिकारी, नगर.