आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगोंदेकरांना आता मिळणार दररोज पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - श्रीगोंदे शहराला दररोज पाणी देण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला असून दोन दिवसांपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे आठ महिन्यांपासून नागरिकांची पाण्यासाठी होणारी हेळसांड थांबली आहे.

श्रीगोंदे शहराची पाणीपुरवठा योजना घोड धरणावर अवलंबून आहे. सलग तीन वर्षे दुष्काळाच्या तडाख्यामुळे घोड धरण पूर्ण न भरल्याने शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत होता. वर्षातून किमान आठ महिने शहरवासीयांना दिवसाआड पाणी मिळत होते. यंदा घोड धरणात कुकडी धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आल्याने धरणातील पाणीसाठा निम्म्यापेक्षा अधिक झाला आहे. घोड कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी काष्टी व वेळू येथील तलावात साठवण्यात येत आहे. कुकडीच्या आवर्तनाद्वारे विसापूर तलावातही पाण्याचा संचय केला जात आहे. त्यामुळे श्रीगोंदे शहरावरील पिण्याच्या पाण्याचे संकट किमान सहा महिन्यांसाठी तरी टळले आहे. घोड धरण पूर्ण भरले, तर वर्षभर तरी श्रीगोंदेकरांना पाण्याची चिंता राहणार नाही. पाण्याची मुबलकता लक्षात घेऊन नगरपालिकेने शहरात दररोज पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन दोन दिवसांपासून तो अमलात आणला आहे. शहरवासीयांना आता दर दिवशी मुबलक पाणी मिळत असल्याने पाणीटंचाईतून त्यांची सुटका झाली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.