आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात अहमदनगर द्वितीय स्थानावर असून जिल्ह्याचा निकाल 91.84 टक्के लागला. यंदाही मुलींनीच आघाडी घेतली आहे. पारनेर तालुक्याचा निकाल सर्वाधिक 95.01 टक्के, तर र्शीरामपूरचा निकाल सर्वात कमी 86.25 टक्के लागला. मुलींची टक्केवारी 92.30, तर मुलांची 91.48 टक्के आहे.
जिल्ह्यातील 67 हजार 786 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 62 हजार 257 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये 34 हजार 505 मुले व 27 हजार 752 मुली आहेत. नगर तालुक्यात सर्वाधिक 5 हजार 667 मुलांनी व 4 हजार 597 मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी 5 हजार 202 (92.07 टक्के) मुले व 4 हजार 256 (92.70 टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या.
यंदाही निकाल ऑनलाईन जाहीर झाला. निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेंमध्ये गर्दी झाली होती. काहींनी एसएमएसद्वारे निकाल जाणून घेतला. ‘स्मार्टफोन्स’वर निकाल पहायला विद्यार्थ्यांनी अधिक पसंती दिली. गेल्या दोन वर्षांपासून मंडळाने गुणवत्ता यादी जाहीर करणे बंद केल्यामुळे दरवर्षी असलेले निकालाचे औत्सुक्य फारसे दिसून आले नाही. गुणपत्रिकांचे वाटप विद्यालयांमध्ये 15 जून रोजी दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे. गुण पडताळणीसाठी विभागीय मंडळांकडे विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.
अंध व अपंग विद्यार्थ्यांचे यश
अनामप्रेम संस्थेतील अंध व अपंग विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले. संभाजी खिलारी (75), संतोष जाधव (76), दीपक गाजरे (82), अमोल (79), शशिकांत कुलट (76), जावेद शेख (78) यांचा त्याच समावेश आहे. झोपडपट्टय़ांमध्ये स्नेहालयतर्फे चालवल्या जाणार्या बालभवनचा निकालही उत्कृष्ट लागला. 65 पैकी 49 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अजय केंजारिया (76), सागर वैरागर (72), साबा सय्यद (71) मुकेश चकाले (70), एतश्याम बागवान (70) यांनी स्पृहणीय यश मिळवले. स्नेहालय पुनर्वसन केंद्रातील आकाश गायकवाड, हबीब शेख, बबलू पुजारी, अमोल धनापुरे, नीलेश डहाळे, किरण गायकवाड, सागर आव्हाड, मनीष अहिरे, गणेश कांबळे, उमा बोंदरे, प्रियंका कचरे यांनी लक्षणीय यश मिळवले.
विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा
कमी गुण मिळालेल्या किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी परीक्षा मंडळाने हेल्पलाइनवर समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. 13 जूनपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी साडेपाच या वेळेत संपर्क साधता येईल. समुपदेशक व संपर्क क्रमांक - टी. एम. बांगर - 9763557131 (न्यू आर्टस् महाविद्यालय) व एस. एल. कानडे - 9028027353 (ज्ञानसरिता विद्यालय).
शंभर टक्के निकाल
सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल, अहमदनगर पब्लिक स्कूल, राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल,वर्का स्कूल (अरणगाव),अ. ए. सो. इंग्लिश मीडियम स्कूल,ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल, मेहेर इंग्लिश स्कूल, पी. ए. इनामदार स्कूल, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल (98.94), रेसिडेन्शिअल हायस्कूल (97.06)
अकरावी प्रवेशासाठी सोमवारी बैठक
जिल्ह्यातील महाविद्यालयांत अकरावीसाठी 63 हजार 600 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. त्या तुलनेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 62 हजार 200 असल्याने प्रवेशासाठी कसरत करण्याची वेळ विद्यार्थी व पालकांवर येणार नाही. सोमवारी (10 जून) अकरावी प्रवेशाबाबत शिक्षणाधिकार्यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.