आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करात भरती होण्यासाठी बनावट शिक्क्याचा वापर; तरुणावर गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - लष्करात भरती होण्यासाठी बनावट शिक्का खरा भासवून हातावर मारून भरती उमेदवारांसोबत जाऊन फसवणूक केल्याची घटना पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शनिवारी सकाळी घडली. याबाबत निंबळक येथील तरुणावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यालयाच्या मैदानावर लष्करातील विविध पदांसाठी भरती सुरू आहे. विविध चाचण्यांद्वारे निवड झालेले उमेदवाराच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ लष्कर अधिकारी शिक्का मारतात. शनिवारी सकाळी निवड झालेल्या उमेदवारांमध्ये दीपक संपत मंचरे (21, रा. पांडुरंगनगर, निंबळक, ता. नगर) हा निवड झालेल्या उमेदवारांमध्ये जाऊन उभा राहिला. लष्करी अधिकार्‍यांना त्याच्या हातावर मारलेल्या शिक्क्याबाबत संशय आल्याने त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत मेजर जगतसिंह सकरसिंह राठोड (35, एमआयआरसी, सोलापूर रोड) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मंचरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.