आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खर्च सादर न करणार्‍या पक्षांना नोटिसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - निवडणूक आयोगाचा आदेश धुडकावून पहिल्या टप्प्यातील खर्च सादर न करणार्‍या पक्षांवर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आयोगाचे आदेश धुडकावून पक्षांनी खर्च सादर केला नसल्याचे ‘दिव्य मराठी’ने सोमवारी उघडकीस आणले. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी विजय कुलकर्णी यांनी लेखा अधिकार्‍याला तातडीने संबंधित पक्षांना नोटिसा पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या 28 डिसेंबर 2006 च्या आदेशानुसार आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर 20 व्या दिवशी पक्षांनी त्यांचा पहिल्या टप्प्यातील खर्च सादर करणे बंधनकारक आहे. दुसर्‍या टप्प्यातील खर्च आचारसंहिता सुरु झाल्यापासून 35 व्या दिवशी, तर अंतिम खर्च निकालानंतर तीन दिवसांत जमा करणे बंधनकारक आहे. पहिल्या टप्प्यातील खर्च सादर करण्याची मुदत उलटली, तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे आदी प्रमुख पक्षांनी आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. 27 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील खर्च सादर करणे आवश्यक होते. उमेदवारी अर्ज भरण्यापासून खर्चाची सुरुवात गृहित धरल्यास हा खर्च 8 डिसेंबरला सादर करणे बंधनकारक होते.
संबंधित पक्षांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशारा आयोगाने दिला आहे.