आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ बोनेलीज गरुडावर नगर वनविभागात उपचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई जवळ धनगरवाडी परिसरात बुधवारी सकाळी जखमी अवस्थेत सापडलेल्या बोनेलिज गरुडावर नगर येथे उपचार करण्यात आले. हा दुर्मिळ गरुड आहे. त्यामुळे त्याचे प्राण वाचवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. या गरुडाला वनविभागात ठेवण्यात आले आहे.

नगर परिसरात काही ठिकाणी या दुर्मिळ बोनेलिज जातीच्या गरुडाची घरटी आहेत. सध्या त्यांचा विणीचा हंगाम आहे. त्यामुळे आकाशात त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यातीलच हा गरुड रस्त्याच्या कडेला पडलेला असल्याचे धनगरवाडी येथील जिल्हा बँकेतील सुनील ससे यांना आढळून आले. त्यांनी तातडीने वनविभागास कळवले. वन विभागाचे जेऊर येथील कर्मचारी फारूक शेख, तुकाराम तवले यांनी गरूडास नगर येथे आणले.
उपवनसंरक्षक श्री लक्ष्मी, वनपरिक्षेत्र अधिकारी भास्कर शिंदे यांनी त्याची पाहणी करून याबाबत निसर्गमित्र मंदार साबळे यांना कळवले. या गरुडाच्या उजव्या पायाला पंखाला जखम झाली आहे. ती बरी होण्यासारखी आहे. या गरुडावर पशुवैद्य डॉ. संतोष गायकवाड यांनी उपचार केले. त्यांना साबळे यांनी मदत केली. यावेळी वन कर्मचारी संदीप कदम बाबासाहेब बडेकर उपस्थित होते. उपचारानंतर या गरुडास पुन्हा त्याच परिसरात मुक्त करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी केडगाव बाह्यवळण रस्त्यावर सापडलेल्या चिंकारा जातीच्या हरणाच्या पाडसास पुणे येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात हलवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...