आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये नगरच्या अर्शिन मेहता हिचे पदार्पण, ‘द रॅली’ चित्रपट उद्या देशभर प्रदर्शित होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दहावीपर्यंतचे शिक्षण नगरमध्ये घेतलेली अर्शिन मेहता हिचा पहिला हिंदी चित्रपट ‘द रॅली’ सप्टेंबरला भारतात प्रदर्शित होत आहे. जाहिरात क्षेत्रात यशस्वी मॉडेल म्हणून नावाजलेल्या अर्शिनचे बॉलिवूड पदार्पण नगरचे नाव उंचावणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक दीपक आनंद यांनी हिमालयीन रॅलीवर आधारित या चित्रपटात अर्शिनला मुख्य भूमिका दिली आहे. नगरमधील माय सिनेमात सायंकाळी ७.३० वाजता प्रीमियर होणार असून यावेळी स्वत: अर्शिन उपस्थित असेल. आयएमएस संस्थेचे संचालक डॉ. मेहेरनोश मेहता यांची ती कन्या आहे. 
 
अर्शिनच्या कलाक्षेत्रातील वाटचालीबाबत डॉ. मेहेरनोश शिराज मेहता यांनी सांगितले, दहावीनंतरच्या कल चाचणीत अर्शिनचा कल सीए अभ्यासक्रमाबरोबरच अभिनयाकडे असल्याचे आढळले. तिने प्रथम सीए होण्याचे ठरवले. दहावीपर्यंतचे तिचे शिक्षण नगरमधील आर्मी स्कूलमध्ये झाले. अकरावी, बारावी तिने श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या ज्युनियर कॉलेजमध्ये केली. बारावीत ती शाळेतील टॉपर ठरली. नंतर तिने बी. कॉम. सीए अभ्यासक्रम पुण्यात पूर्ण केला.

 
नंतर तिने आपल्या आवडत्या अभिनय क्षेत्राकडे वळण्याचे ठरवून प्रारंभी मॉडेल म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यासाठी तिने पुण्यातील नरी हिरा यांच्या स्टार डस्ट अकॅडमीत अभिनय मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेतले. नगरमधील एस. जी. कायगावकर ज्वेलर्सपासून इम्पिरियल ब्ल्यू, टायटन वॉचेस, एरियल वॉशिंग पावडर, गोदरेज प्युरिफायर, सॅमसंग फोन, मारुती सुझुकी, पारले, अमेरिकाना बिस्किट, यामाहा, आयपीएल पुणे टीम, मॅकडोनाल्डस् अशा अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या जाहिरातीत अर्शिनने काम केले. अभिनेत्री दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफ, अभिनेता नील मुकेश अशा दिग्गजांसमवेत जाहिरात क्षेत्र गाजवताना अर्शिन घराघरात पोहोचली. अर्शिनमधील अभिनय गुण हेरून प्रसिध्द दिग्दर्शक दीपक आनंद यांनी तिला चित्रपटात संधी दिली. निर्माता रोहित कुमार यांच्या रॅली चित्रपटात नवोदित अभिनेता मिर्झा याच्याबरोबर नायिका म्हणून अर्शिन झळकणार आहे. हिमालयीन रॅली त्या अनुषंगाने फुलणाऱ्या प्रेमकथेवर हा चित्रपटात बेतलेला आहे. 
 
आई-वडिलांकडून मिळाले प्रोत्साहन 
या यशाबद्दल अर्शिन म्हणाली, वडील डॉ. मेहेरनोश आई शिराज यांचे मार्गदर्शन प्रोत्साहन मिळाल्याने सीए झाल्यानंतर मॉडेलिंग करण्याची संधी मला मिळाली. आई-वडिलांनी हव्या त्या क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी प्रेरणा दिली. वेगळा आशयपूर्ण कथानक असलेला माझा पहिला चित्रपट नगरच्या प्रेक्षकांना निश्चितच आवडेल, असा विश्वास अर्शिन हिने व्यक्त केला. 
 
 
बातम्या आणखी आहेत...