आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: जिल्ह्यात पुन्हा मुलींचीच बाजी; 90.09 टक्के निकाल, पुणे विभागात नगर तिसरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकाल पाहण्यासाठी नगर शहरात विविध ठिकाणी गर्दी झाली होती. त्यात मुलींची संख्या लक्षणीय होती. - Divya Marathi
निकाल पाहण्यासाठी नगर शहरात विविध ठिकाणी गर्दी झाली होती. त्यात मुलींची संख्या लक्षणीय होती.
नगर: राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाने मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ९०.०९ टक्के लागला. परीक्षेला बसलेली मुले ८७.६० टक्के, तर मुली ९३.५८ टक्के उत्तीर्ण झाल्या. पुणे विभागात नगर तिसऱ्या स्थानावर आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली अाहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. 
 
मोठ्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी दहावीचा ऑनलाईन निकाल दुपारी एक वाजता जाहीर झाला. अॅन्ड्रॉईड फोनची क्रेझ नसताना सायबर कॅफेत निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत असे. आता प्रत्येकाकडेच अॅन्ड्रॉईड इंटरनेट सुविधा असल्याने सायबर कॅफेवर गर्दी नव्हती. यंदा जिल्ह्यातील ९७२ शाळांमधून ७३ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ६६ हजार ५३५ उत्तीर्ण झाले. त्यात ३७ हजार ८०१ मुले २८ हजार ७३४ मुलींचा समावेश आहे. 
बारावी प्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही मुलीच सरस ठरल्या. पुणे जिल्ह्याचा निकाल ९२.७४, सोलापूर ९२.४७, तर नगर जिल्ह्याचा ९०.९ टक्के निकाल लागला. पुनर्परीक्षेला जिल्ह्यातून हजार २६१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९३५ उत्तीर्ण झाले. निकाल ४१.३५ टक्के लागला. 
 
श्रीगोंद्याची कन्या १०० टक्के गुणांसह अव्वल 
श्रीगोंदे तालुक्यातील चिखली येथील प्रिती झेंडे हिने सातारा येथील विद्यालयातून दहावीची परीक्षा दिली. तिने १०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तिचे आई-वडील नगर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. तिच्या यशामुळे झेंडे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. 
प्रितीने सातवीपर्यंतचे शिक्षण श्रीगोंदे तालुक्यातील राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयात घेतले. रयत संस्थेच्या निवासी गुरुकूल प्रकल्पांतर्गत परीक्षा दिल्याने तिची सातारा येथील महाराजा सयाजीराव विद्यालयात निवड झाली. तिला दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळाले. मराठी ९३, संस्कृत ९९, इंग्रजी ९१, गणित १००, विज्ञान ९९, सोशल ९९ असे गुण तिने मिळवले. याव्यतिरिक्त दहा गुण देण्यात आले आहेत. त्यानुसार तिला पाचशे पैकी पाचशे गुण मिळाले आहेत. ती राज्यात अव्वल ठरली. प्रिती म्हणाली, मी जास्तीत जास्त अभ्यास पुस्तके वाचूनच केला. इतर अपेक्षित प्रश्नोत्तरे मार्गदर्शक फारसे वाचले नाहीत. पुढील शिक्षणासाठी लातूरला जाणार आहे. आयएएस, आयपीएस परीक्षा देण्याची तयारी करायची अाहे. तिला वडील नारायण, आई वैजयंता, राजेंद्र ज्योती काळे यांचे मार्गदर्शन लाभले. 
 
जिल्ह्यातील१३७ शाळांचा शंभर टक्के निकाल 
जिल्ह्यातील अनेक विद्यालयांचा निकाल नव्वद टक्क्यांहून अधिक लागला आहे. शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १३७ वर पोहोचली आहे. उज्ज्वल यशाची परंपरा शाळांना जपली आहे. 
 
शहरातील निकाल 
सेंट सेव्हीअर हायस्कूल ९०, महर्षी ग. ज. चितांबर ७१.६८, सरस्वती मंदिर ४२.८५, न्यू इंग्लिश स्कूल ९६.५१, भाई सथ्था नाईट स्कूल ७९.५६, सेक्रेड हार्ट ९८.६५, सिताराम सारडा ८०.१४, भिंगार हायस्कूल ८९.६२, दादासाहेब रुपवते विद्यालय ७६.३८, पंडित नेहरु हिंदी विद्यालय ६३.१५ टक्के. 
 
तालुका निहाय टक्केवारी 
अकोले ८९, जामखेड ९०.७६, कर्जत ९१.९०, कोपरगाव ८६.१५, नगर ९१.४५, नेवासे ८९.५८, पारनेर ९४.८०, पाथर्डी ९३.३९, राहाता ९०.२६, राहुरी ८६.६९, संगमनेर ८९.५८, शेवगाव ९३, श्रीगोंदे ९३, श्रीरामपूर ८०.७०. 
 
१७ हजार विद्यार्थ्यांना मिळाले डिस्टिंक्शन 
नगर जिल्ह्यातून परीक्षा दिलेल्या १७ हजार ७५८ विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन श्रेणी मिळाली आहे. २६ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणी, द्वितीय १९ हजार ३१, तर तृतीय श्रेणीत साडेतीन हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
 
प्रिती झेंडे १०० टक्के ‘दिव्य मराठी’चे आवाहन 
दहावीच्या परीक्षेत शहर जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांना ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले असतील, अशांनी आपले पासपोर्ट आकारातील छायाचित्र गुणपत्रिकेची प्रत दैनिक दिव्य मराठीच्या (सिव्हिल हडको, रामकरण सारडा विद्यार्थीगृहासमोर) कार्यालयात तातडीने जमा करावी. गुणवंत विद्यार्थ्यांचे छायाचित्र गुण दैनिक दिव्य मराठीमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दैनिक दिव्य मराठीच्या वतीने अभिनंदन करून त्यांनी शुभेच्छा देण्यात आल्या. 
 
बातम्या आणखी आहेत...