आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदामांना लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बुरुडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉनच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या बारदाना गोदामांना शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तीन गोदामे आगीत खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली.
महापालिकेच्या अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तथापि, आगीच्या रुद्रावतारासमोर अग्निशमनचे प्रयत्न निष्फळ ठरले. प्रताप सांगळे, सचिन वाघचौरे व परेश बजाज यांच्या मालकीची ही गोदामे आहेत. आग लागल्याचे लक्षात येताच आवारात राहणार्‍या कामगारांनी गोदामांकडे धाव घेतली. एमआयआरसी, एमआयडीसी, सावेडी, राहुरी येथून अग्निशमन बंब आले. परिसरातील नागरिकांनीही पाणी मारुन आग शमवण्यासाठी मदत केली. आग आटोक्यात आणण्यासाठी पन्नास गाड्यातील पाण्याचा वापर करण्यात आला. नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे.