आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस भरतीसाठी साडेपाचशे उमेदवारांची आज मैदानी चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पोलिस भरती प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. कागदपत्र व शारीरिक तपासणीनंतर मंगळवारच्या मैदानी चाचणीसाठी साडेपाचशे उमेदवार पात्र ठरले आहेत. दररोज एक हजार उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येत आहे.

सोमवारी एक हजार उमेदवारांना बोलावण्यात आले. मात्र, पावणेसातशे उमेदवारच आले. यातील 130 उमेदवार कागदपत्रांची पडताळणी व शारीरिक मोजमापात अपात्र ठरले. उर्वरित साडेपाचशे उमेदवारांची मंगळवारी मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीची सुरुवात पाच किलोमीटर धावण्यापासून करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना पहाटे पाचलाच उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. पहिला दिवस असल्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांना पहाटे चार वाजता बोलावण्यात आले आहे. धावण्याच्या चाचणीनंतर पोलिस मुख्यालय मैदानावर इतर मैदानी चाचण्या होतील.

मंगळवारी बोलावलेल्या एक हजार उमेदवारांपैकी उपस्थित असणार्‍यांची कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप सुरू राहणार आहेत. पहिल्याच दिवशी मोबाइलचा वापर करणार्‍या एका अधिकारी व कागदपत्रांची फाईल घेऊन भटकणार्‍या कर्मचार्‍यांना पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी फटकारले. संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.