आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंब झाले नगर, शहरात दुपारनंतर जोरदार पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- रविवारी सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी होऊन वातावरण कुंद झाले होते. सकाळी भिंगार परिसरात सरी कोसळल्या. दुपारी तीननंतर नगर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली.
सुमारे तासभर सरी कोसळत होत्या. पाऊस झाल्यानंतर काही वेळातच शहरातील रस्ते जलमय झाले. सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शहरातील इतर रस्त्यांनाही ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. रस्त्यांवर पडलेले मोठमोठ्ठे खड्डे, त्यात साचलेले पाणी यामुळे वाहनचालकांचे हाल झाले. पाऊस सुरू असताना रहदारी एकदम कमी झाली होती.