आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिन्ही मंत्र्यांनी केली वाहने जमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील तीन मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, तसेच पंचायत समित्यांचे सभापती आदी पदाधिकाऱ्यांनी शनिवारी आपली शासकीय वाहने जमा केली.

विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून आदर्श आचारसंहिता जारी झाली आहे. आचारसंहितेमुळे मंत्री बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड व राधाकृष्ण विखे यांनी आपली शासकीय वाहने जमा केली आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्यासह सर्व समित्यांचे सभापती, तसेच पंचायत समित्यांच्या सभापतींनी आपली शासकीय वाहने जमा केली आहेत. जिल्हाधिकारी कायालर्यात जिल्हा परिषदेची सहा वाहने, तीन मंत्र्यांची वाहने, तर पंचायत समिती सभापतींची वाहने त्या त्या पंचायत समिती कार्यालयांत जमा करण्यात आली आहेत.

एसटी बसवरील जाहिराती काढण्याच्या सूचना
आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु असताना एसटी बसेसवर मात्र अजूनही आघाडी सरकारच्या जाहिराती झळकत आहेत. एसटीच्या अधिकाऱ्यांना जाहिराती काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी यांनी शनिवारी सांगितले.