आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Lok Sabha Constituncy News In Marathi, Dilip Gandh, BJP, Rajale, NCP

निवडणुक आयोगाकडे गांधी, राजळे यांच्यासह आठ जणांचे खुलासे सादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने आयोगाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजीव राजळे व भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्यासह अन्य उमेदवारांना नोटिसा पाठवल्या होत्या. राजळे, गांधींसह आठजणांनी खुलासा सादर केला आहे, अशी माहिती या कक्षाचे प्रमुख विजय कोते यांनी बुधवारी दिली.
निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने नगरच्या 13, तर शिर्डीतील 4 उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नगरमधून दिलीप गांधी, राजीव राजळे, अपक्ष उमेदवार बी. जी. कोळसे, अजय बारस्कर, आम आदमी पक्षाच्या दीपाली सय्यद यांच्यासह अन्य उमेदवारांना नोटिसा बजावून 48 तासांच्या आत खुलासा मागवण्यात आला होता. गांधी, राजळे, पेत्रस गवारे, विकास देशमुख, अनिल घनवट, पोपट फुले, श्रीधर दरेकर व लक्ष्मण सोनाळे यांनी खुलासा सादर केला. निवडणूक खर्च नियंत्रक समिती 72 तासांनंतर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून निर्णय घेईल, असे कोते यांनी सांगितले.
राहुरीत आचारसंहिता भंगाचा गुन्हा
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे दत्तात्रेय आडसुरे (उंबरे) व भाजपचे राजेंद्र गोपाळे (बारागाव नांदूर) यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गणेश कारभारी शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. अनधिकृतपणे कमानी उभारून उमेदवारांच्या प्रचारासाठी झेंडे लावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.